महाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, ऑक्सिजनची मागणी देखील वाढली

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. काही रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राज्यात ऑक्सिजनची मागणी देखील वाढली असून सध्या दररोज 424 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे. दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा होणार नसल्याचा दावा करत पुरेसा ऑक्सिजनसाठा असल्याचे म्हटले आहे.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून ऑक्सिजनची मागणी वाढणार असल्याची शक्यता आहे. प्रशासनाने त्यादृष्टीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. राज्याला सध्या 424 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज पडत आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत दिवसाला 270 ते 300 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता होती. रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. राज्यात ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्यात आले असल्याची माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. पहिल्या लाटेत दिवसाला 850 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी होती, दुसऱ्या लाटेतही ऑक्सिजनची मागणी वाढली होती. कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी इतर राज्यांतून ऑक्सिजन मागवावा लागला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान राज्यात ऑक्सिजन उत्पादन करणारे प्लांटही उभारण्यात आले, त्यामुळे राज्याकडे पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येत आहे.

राज्यात शुक्रवारी तब्बल 40 हजार 925 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 14, 256 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 876 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे, त्यापैकी 435 रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी मुंबईत 20 हजार 971 रुग्णांची नोंद झाली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago