monkeys killed a four month old child
उत्तर प्रदेश : माकडांच्या कळपाने 4 महिन्यांच्या बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री वडील आपल्या बाळाला घेऊन गच्चीवर फिरत होते. त्यावेळी, अचानक माकडांच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला केला. माकडांनी वडिलांकडून बाळाला हिसकावले आणि तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. या घटनेत बाळाचा जागीच मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशातील बरेली येथील डंका गावात राहणारे शेतकरी निर्देश उपाध्याय हे शनिवारी रात्री आठच्या सुमारास त्यांचा मुलगा आणि पत्नी स्वातीसोबत टेरेसवर फिरत होते. यावेळी अचानक माकडांचा कळप टेरेसवर आला आणि माकडांनी त्यांच्यावर हल्ला केला. यादरम्यान स्वाती घाबरून खाली पळून गेल्या. त्याचवेळी काही माकडांनी निर्देश यांना घेराव घातला आणि त्यांच्याकडून बाळाला हिसकावून खाली फेकून दिले.
दरम्यान, या घटनेचा तपास करण्यासाठी पथक पाठवण्यात आले असून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…