mohammad azharuddin accident in sawai madhopur
जयपूर : माजी क्रिकेटपटू आणि कॉंग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दीन यांचा राजस्थानातील सवाई माधोपूर येथे अपघात झाला. या अपघातात मोहम्मद अझरुद्दीन यांची गाडी पलटली. लालसोट कोटा मेगा हायवेवरील सुरवाल पोलिस ठाण्याजवळ हा अपघात झाला. मोहम्मद अझरुद्दीन या अपघातातून थोडक्यात बचावले.
माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन यांच्या धावत्या कारचा टायर निखळल्यामुळे गाडी अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यात घुसली. या अपघातात अझरुद्दीन व त्याच्या कुटूंबाला कोणतीही इजा झाली नाही, परंतु ढाब्यावर काम करणारी चाळीस वर्षाची एक व्यक्ती जखमी झाली आहे. त्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या भीषण अपघातानंतर तिथे गर्दी जमली. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला दुसर्या गाडीतून हॉटेलमध्ये नेण्यात आले. त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अझरुद्दीन आपल्या परिवारासोबत रणथंभोरला येत होते.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…