देश

यूकेमधून परत आलेल्या 565 जणांचे मोबाईल बंद, उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट

ब्रिटनमधून आलेल्या कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन आता भारतात पसरत आहे. आतापर्यंत देशात अशी दोन डझनपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यात कोरोनाच्या नवीन स्ट्रेनची लक्षणे आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत अशी 10 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे.

कोरोनाच्या या नवीन स्ट्रेनची लक्षणे असलेल्या दहा लोकांपैकी एक मेरठमधील, नोएडामधील तीन, गाझियाबादमधील दोन आणि बरेली येथे एक आहे. तर दोन दिल्लीतील रहिवासी असून यूपीला आले आहेत. मेरठमध्ये प्रथम, कोरोनाचा नवीन स्ट्रेन दोन वर्षांच्या मुलीमध्ये सापडला, जिचे कुटुंब युके हून परत आले होते. यानंतर यूपी सरकारने सर्व जिल्ह्यांना सतर्क केले होते.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, यूकेमधून युपीमध्ये परत आलेल्या एकूण लोकांपैकी जवळपास 565 जणांचे मोबाईल बंद असून त्यांचा पत्ता शोधण्याचे काम चालू आहे. यूकेमधून यूपीमध्ये परत आलेल्या 950 जणांना तपासण्यात आलं आहे, तर इतरांचा शोध घेतला जात आहे आणि त्यानंतर त्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago