‘Missing Report’ Filed Against Amit Shah
नवी दिल्ली : ‘नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडिया’ (NSUI) संघटनेचे सरचिटणीस नागेश करियप्पा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेपत्ता असल्याची तक्रार बुधवारी दिल्ली पोलिसांत दाखल केली आहे. अशा संकट प्रसंगी पळून न जाता देशवासियांची काळजी घेणं आणि सेवा करणं हे राजकीय व्यक्तीचं काम असल्याचंही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
गृहमंत्री शहा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलीस करियप्पा यांची चौकशी करण्यासाठी आल्याचा दावा एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते लोकेश चूग यांनी केला. २०१३ पर्यंत राजकीय नेते नागरिकांना उत्तरासाठी बाध्य होते. परंतु, भाजप सत्तेत आल्यानंतर मात्र हे चित्रं पालटलं. महामारी सारख्या कठीण काळात पंतप्रधान पदानंतर दुसऱ्या अतिशय महत्त्वाच्या पदावर असलेली व्यक्ती मात्र गायब झाली आहे, अशी घणाघाती टीका चूग यांनी यावेळी केली.
देशातील सर्वच जण अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहेत. अशा काळात नागरिकांना आधार देणं आणि जबाबदारी घेणं हे सरकारचं कर्तव्य आहे. परंतु, सद्य सरकार मात्र यात अपयशी ठरत असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे गृहमंत्री बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. सरकार देशाच्या प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर देईल, अशी आशा आहे, असंही नागेश करियप्पा यांनी म्हटलं आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…