widow woman blackmail
चंदीगड : पंजाबच्या सहाय्यक उपनिरीक्षकाने लज्जास्पद कृत्य केलं आहे. बठिंडाच्या सीआयए स्टाफमध्ये तैनात असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर गुरविंदरसिंग याला ग्रामस्थांनी असा धडा शिकविला की तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. एका विधवेला ब्लॅकमेल करून तिच्यावर शारीरिक अत्याचार करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला गावकऱ्यांनी आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस विभागाने तातडीने कारवाई करत गुरविंदरसिंगला नोकरीवरून काढून टाकले.
पोलिसांना बठिंडा येथील एका गावातून आलेल्या तक्रारीत समजले की गुरविंदर सिंगला एका महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा होती. ही महिला विधवा होती जी आपल्या 20 वर्षांच्या मुलाला मोठ्या कष्टाने वाढवत आहे. गुरविंदरसिंग गेल्या तीन महिन्यांपासून या महिलेला त्रास देत होता. महिलेने त्याचे म्हणणे ऐकले नाही, त्यामुळे तो काही पोलिसांसह 6 मे रोजी तिच्या घरी पोहोचला आणि तिथे छापेमारी सुरु केली.
गुरविंदरसिंग याने अफूच्या तस्करीचा खोटा गुन्हा दाखल करून विधवेच्या 20 वर्षाच्या मुलाला अटक केली असा आरोप आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या लक्षणांमुळे महिलेचा मुलगा घरात विलगीकरणात होता. गुरविंदरसिंगने विधवा महिलेकडे तिच्या मुलाला सोडण्याच्या बदल्यात दोन लाख रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एक दिवस गुरविंदर त्या महिलेच्या घरी आला आणि महिलेने मुलाच्या उपचारासाठी जमा केलेले 60,000 रुपये जबरदस्ती घेऊन गेला. तसेच महिलेला धमकी दिली की जर मुलाची सुटका करायची असेल तर दोन लाख रुपयांची व्यवस्था कर. पीडित महिलेने कसेबसे नातेवाईकांकडे पैसे मागितले आणि एक लाख रुपये जमा करून ते गुरविंदरसिंगला दिले. तरीदेखील त्याने मुलाला सोडले नाही. त्यानंतर त्याने महिलेकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली.
जेव्हा गुरविंदरसिंगचा त्रास असह्य झाला तेव्हा या महिलेने गावकऱ्यांकडे मदत मागितली. जेव्हा महिलेने ही संपूर्ण गोष्ट गावकऱ्यांना सांगितली, तेव्हा आरोपी गुरविंदरसिंगला रंगेहाथ पकडण्यासाठी आणि त्याचा पर्दाफाश करण्यासाठी गावच्या सरपंचांनी महिलेच्या घरात कॅमेरे बसवले.
मंगळवारी योजनेनुसार, महिलेने आरोपी एसआय गुरविंदरसिंगला रात्री आठ वाजता तिच्या घरी बोलावले. हा संपूर्ण सापळा पंचायत सरपंच कुलविंदर सिंग आणि माजी सरपंच थाना सिंह यांच्या देखरेखीखाली रचण्यात आला. गुरविंदरसिंगला आतून दरवाजा बंद करता येऊ नये म्हणून त्यांनी मुद्दामच दरवाजाची कडी खराब केली. गुरविंदरसिंग महिलेच्या घरात पोहोचला आणि त्याने आपले कपडे काढताच ग्रामस्थांनी दार उघडले आणि त्याला आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडले. ग्रामस्थांनी सर्व प्रकरणाची माहिती एसएसपी बठिंडा यांना दिली आणि गुरविंदरसिंगला पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर आरोपी गुरविंदर सिंग विरोधात भादंविच्या ३७६ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…