देश

मेहुल चोकसी याचे तुरुंगातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली : PNB घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मेहुल चोकसी सध्या डॉमिनिका देशाच्या तुरुंगात पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे, त्याचे तुरुंगातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये चोकसीच्या डोळ्याला इजा असून हातावर जखमा झालेल्या आहेत. या फोटोमध्ये मेहुल चोकसी घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहे.

डॉमिनिका पोलिसांकडून चोकसी याची चौकशी सुरु आहे. तर कोर्टाकडून चोकसीला कायदेशीर मदत नाकारण्यात आली आहे. देशात बेकायदेशीर प्रवेश केल्याचा ठपका मेहुल चोकसीवर डॉमिनिका सरकारने ठेवला आहे. दरम्यान, त्याच्या वकिलांना दोन मिनिटांसाठी भेट घेण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी चोकसीचा फोटो घेण्यात आला. फोटोत तो घाबरलेला दिसत आहे. त्याचा डावा डोळा लाल झाला आहे. तसेच त्याने डाव्या हाताला झालेल्या जखमा दाखवल्या.

मेहुल चोकसीचे जॉली हार्बर येथून अपहरण झाल्याचा दावा त्याचे वकील वेन मार्श यांनी केला. अँटिग्वामधील जॉली हार्बर येथून एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने चोकसीला बोटीतून डॉमिनिका येथे आणले. यावेळी अँटिगुआ पोलीस देखील या बोटीवर होते. या दरम्यान चोकसीला मारहाण झाली असून त्याच्या अंगावर अनेक जखमा आहेत, असे त्याच्या वकिलाने म्हटले आहे. चोकसी याला न्यायालयात हजर राहून बाजू मांडण्याची संधी मिळावी, अशी विनंती करणारी याचिका चोकसीच्या वकिलाकडून डॉमिनिकाच्या कोर्टात दाखल करण्यात आली आहे.

ब्रेकिंग : PNB घोटाळ्याचा सूत्रधार मेहुल चोकसीला अटक

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

17 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago