महाराष्ट्र

शहीद जवान जिजाभाऊ मोहिते यांना अखेरचा निरोप

परभणी : भारतीय हवाई दलातील जवान जिजाभाऊ किशनराव मोहिते यांच्यावर शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता पूर्णा तालुक्यातील महागाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जिजाभाऊ यांच्या कुटुंबीयांनी धार्मिक रीतीनुसार अंत्यविधी पूर्ण केला. पोलीस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून त्यांना मानवंदना दिली. तसंच, हवाई दलाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. तत्पूर्वी, शहीद जिजाभाऊचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

पठाणकोट येथे तैनात असलेल्या जिजाभाऊंची तब्येत अचानक बिघडली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, अखेर गुरुवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचं पार्थिव महागाव इथं आणण्यात आलं. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांचे अत्यंदर्शन घेतले. उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, खासदार संजय जाधव, नांदेडचे आमदार मोहनराव हंबर्डे, तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर, सैनिक कल्याण कार्यालयाचे पाटील तसेच विविध पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिकांनी पुष्पचक्र वाहून मोहित यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला, त्यांना अखेरचा निरोप देताना सर्वांचे डोळे पाणावले.

जिजाभाऊ यांचं वय अवघं २६ वर्षे होतं. मागील वर्षीच नांदेड जिल्ह्यातील मार्कंड या गावातील भाग्यश्री यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सलाम! शहीद मेजर विभूती धौंडियाल यांची पत्नी भारतीय सैन्यात दाखल, आजपासून ‘लेफ्टनंट नितिका धौंडियाल’

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago