major vibhuti dhoundiyal martyred in pulwama attack his wife nikita dhoundiyal joins indian army
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले मेजर विभूती शंकर धौंडियाल यांची पत्नी नितिका कौल आज भारतीय सैन्यात दाखल झाली आहे. सैन्यात भरती झाल्यानंतर त्या आता ‘लेफ्टनंट नितिका धौंडियाल’ बनल्या आहेत. नितीका यांनी आज भारतीय सैन्याचा गणवेश परिधान करून हुतात्मा मेजर विभूती शंकर यांना श्रद्धांजली वाहिली. मेजर विभूती फेब्रुवारी 2019 मध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले होते.
18 फेब्रुवारी 2019 रोजी, जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे मेजर धोंडीयाल यांना वीरमरण आले होते. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतरच सैन्याने पुलवामाच्या पिंगलान गावात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोहीम राबविली होती. त्यावेळी पिंगलानमध्ये झालेल्या चकमकीत चार जवान ठार झाले. या शहीद झालेल्या जवानांमध्ये मेजर विभूती धोंडियाल यांचादेखील समावेश होता.
मेजर धोंडियाल आणि नितीका यांचे लग्न होऊन तेव्हा केवळ 10 महिने झाले होते. त्यावेळी आपल्या पतीला शूर सैनिक म्हणत नितीका कौल म्हणाल्या होत्या कि, “मला पूर्ण विश्वास आहे की माझे पती मेजर विभूती यांना आलेलं वीरमरण अनेक जणांना सैन्यात सामील होण्यासाठी प्रेरणा देईल.”
मेजर विभूती शंकर धौंडियाल यांचे पार्थिव त्यांच्या गावी पोहोचले, तेव्हा त्यांची पत्नी नितिका यांनी त्यांच्या पार्थिवाजवळ उभी राहून त्यांना सॅल्यूट केला होता. त्यावेळी नितीका म्हणाल्या होत्या कि, “तुम्ही मला खोटे सांगितले होते की तुम्ही माझ्यावर प्रेम करता. तुम्ही माझ्यावर नाही, तर आपल्या देशावर जास्त प्रेम करत होता आणि मला त्याचा अभिमान आहे.” माध्यमांशी बोलताना नितिका म्हणाल्या होत्या की मी बिचारी व्यक्ती नसून शूर हुतात्माची पत्नी आहे आणि मला माझे पती शहीद झाले त्याचा अभिमान आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…