ग्लोबल

ब्रेकिंग : PNB घोटाळ्याचा सूत्रधार मेहुल चोकसीला अटक

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी आणि फरार डायमंड व्यापारी मेहुल चोकसीबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. मेहुल चोकसी डोमिनिकामध्ये सापडला असल्याची बातमी आहे. तेथील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून आता अँटिगुआ पोलिसांच्या वतीनेही डोमिनिका प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चोकसी याने अँटिगुआमधले त्याचे लपण्याचे ठिकाण बदलले होते. परंतु आता डोमिनिका पोलिसांनी त्याला पकडले आहे आणि लवकरच त्याला अँटिगुआ पोलिसांच्या स्वाधीन केले जाऊ शकते.

मेहुल चोकसी रविवारी म्हणजेच 23 मे रोजी अँटिगुआ येथून फरार झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आज (२६ मे) तो डोमिनिकामध्ये असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं. भारत सरकारकडून सतत मागणी होत होती की मेहुलचे अँटिगुआ नागरिकत्व रद्द केलं जावं, अशा परिस्थितीत तेथील अधिकाऱ्यांवर दबाव येत होता. त्यामुळे मेहुलला त्याच्या भविष्याबद्दल चिंता वाटल्याने त्याने आपली लपण्याची जागा बदलणे हाच एक उत्तम पर्याय राहील, असा विचार करून लोकेशन बदलले आणि काही दिवसांतच तो पुन्हा पोलिसांच्या ताब्यात आला. फरक इतकाच आहे की तो सध्या डोमिनिका पोलिसांच्या ताब्यात आहे, पण लवकरच त्याला अँटिगुआ पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल.

डोमिनिका पोलिसांनी मेहुलला अटक करणे ही भारतासाठी दिलासादायक बातमी आहे, कारण अँटिगुआ प्रशासनाने हे स्पष्ट केले होते की जर मेहुल चोकसी पळून जाण्यात यशस्वी झाला आणि जर तो सापडला नाही, तर प्रत्यर्पण प्रकरणावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया कदाचित अडकून पडू शकते. पण आता मेहुल डोमिनिकामध्ये सापडला आहे, त्यामुळे त्याला भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि आता त्याचे अँटिगुआ नागरिकत्व रद्द करण्याची मागणीही वाढत जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, अँटिगुआ मधून पळून जाण्यात मेहुल यशस्वी झाला होता कारण त्याने एकाच वेळी अनेक कॅरिबियन देशांचे नागरिकत्व घेतले आहे. त्यामुळे तो प्रत्येक वेळी पळून जाण्याचा प्रयत्न करत असायचा. पंजाब नॅशनल बँकेच्या 13,500 कोटी रुपयांच्या सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी मेहुल चोकसी आणि नीरव मोदी आरोपी आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

9 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago