देश

गॅस सिलिंडरवर मिळणाऱ्या सबसिडीबद्दल ग्राहकाने विचारला प्रश्न, सरकारने दिले ‘हे’ उत्तर…

नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडरसंदर्भात लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. त्यातच गॅस सिलिंडर सबसिडीबद्दल बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की सरकारने सबसिडी बंद केली आहे. अनेकजण म्हणतात की आता त्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे येत नाहीत. एलपीजी सिलिंडरवर लोकांना मिळणाऱ्या सबसिडीबद्दल निर्माण झालेले प्रश्न आता सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहेत. जर तुम्हीही अशाच काही प्रश्नांमध्ये गोंधळलेले असाल, तर याबद्दल जाणून घेऊया…

सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे की सरकारने अनुदान बंद केलेले नाही, ते अजूनही चालू आहे, आणि लाभार्थी त्याचा लाभ घेत आहेत. अनुदानासंदर्भात, दिल्लीचे ग्राहक सीएल शर्मा यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाला टॅग करून ट्विट केले आणि त्यात गॅस एजन्सीची स्लिप जोडून विचारले की “आम्ही पुन्हा एकदा जाणून घेऊ इच्छितो की मोदी सरकारने एलपीजी वरील सबसिडी बंद केली आहे का? कारण गेल्या 18 महिन्यात सबसिडीचा एक पैसाही आमच्या खात्यात आलेला नाही, तथापि, गॅस एजन्सी वाउचरवर 859 रुपये यासह सबसिडीचे सिलिंडर असे लिहिते.

ग्राहकाच्या या प्रश्‍नाला सरकारने ट्विट करून उत्तर दिले आणि म्हटले की, प्रिय ग्राहक नोट करा – सबसिडी बंद केली गेलेली नाही. सध्या घरगुती एलपीजी गॅसवरील सबसिडी प्रचलित आहे आणि ती वेगवेगळ्या बाजारात वेगवेगळी उपलब्ध आहे. ही योजना 2014 नुसार सुरु असून, ‘अनुदानित सिलेंडरची किंमत’ आणि ‘विनाअनुदानित सिलेंडरची बाजारात निर्धारित किंमत’ यातील जो फरक असतो, त्यानुसार एखाद्या बाजारासाठी अनुदानाची रक्कम निश्चित केली जाते. याचा अर्थ यातील फरक ० रुपये असल्यास अनुदानाची रक्कम मिळत नाही.

तुम्ही तुमची सबसिडी सोडून देण्यासाठी अर्ज केला असेल, तर तुम्हाला एलपीजी सिलिंडरवर सबसिडी मिळत नाही. याशिवाय आधार कार्ड लिंक नसले, तरी सबसिडी बंद केली जाते. एलपीजीची सबसिडी सर्व राज्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने निश्चित करण्यात आली आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना सबसिडीचा लाभ मिळत नाही, परंतु यापेक्षा कमी कमाई करणारे लोक अनुदानासाठी अर्ज करू शकतात.

गॅस सिलेंडर सबसिडीचा लाभ मिळत नसेल तर काय करावे? जाणून घ्या…

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago