Eknath Khadse join NCP
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून एकनाथ खडसे यांची जळगाव आणि लोणावळा येथील 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची गेल्या काही दिवसांपासून चौकशी ईडीकडून सुरु आहे.
2016 मध्ये महसूलमंत्री असताना खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला होता. या भूखंडाचा बाजारभाव 31 कोटी रुपये असताना गिरीश यांनी तो अवघ्या तीन कोटी रुपयांना विकत घेतला. हा भूखंड MIDCच्या मालकीचा होता. त्यामुळे इतक्या कमी किंमतीत व्यवहार कसा काय झाला? तसंच गिरीश यांनी तो विकत घेण्यासाठी तीन कोटी रुपये कुठून आणले? या प्रश्नांच्या आधारे ईडीने तपास सुरु केला होता.
काही दिवसांपूर्वी खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता एकनाथ खडसेंवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. आज एकनाथ खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…