Large police force deployed at Ghazipur and Singhu border
गाझीपूर आणि सिंघू सीमेवर गुरुवारी दुपारी दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांना मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे. गाझीपुर येथे वीज व पाणीपुरवठा खंडित केला आहे. पोलिसांनी आज शेतकर्यांना रस्ता मोकळा करण्यास सांगितले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री उशिरापर्यंत दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील पोलिस आंदोलनकर्त्यांना हटवण्यासाठी संयुक्त कारवाई करू शकतात. यूपीच्या योगी सरकारने डीएम आणि एसपी यांना सर्व ठिकाणाहून हे आंदोलन संपवण्यास सांगितले आहे. यात गाझीपूरचा देखील समावेश आहे.
दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतरच पोलिस ऍक्शन घेत आहेत. शेतकरी नेत्यांना लुकआउट नोटीस बजावण्यात आली आहे. लाल किल्ल्यावर हिंसाचार करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिसांचे लक्ष सिंघू आणि गाजीपूर सीमेवर आहे, जिथं गेली दोन महिने शेतकरी आंदोलन करत आहेत.
दिल्लीतील ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर योगी सरकारने शेतकर्यांचे उपोषण संपवण्याचा आदेश जारी केला आहे. सरकारने आंदोलन स्थळांवर बसेस पाठवून शेतकऱ्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्यास सांगितले आहे. आंदोलनकर्त्यांनी संध्याकाळपर्यंत ही आंदोलनस्थळं रिकामी करावीत, अशी घोषणा पोलिसांनी गुरुवारी सकाळी गाझीपूर सीमेवर केली होती.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…