देश

लालू यादव तातडीने दिल्ली एम्स रुग्णालयात दाखल, विमानतळावर खालावली होती प्रकृती

पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना दिल्लीतील एम्सच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. दिल्ली विमानतळावर त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना पुन्हा एम्समध्ये आणून दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वॉर्डमध्ये चार डॉक्टरांची टीम आहे. लालूंच्या रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळताच पक्षाचे नेते मनोज झा, प्रेमचंद गुप्ता, मिसा भारती, राजश्री यादव, संजय यादव, भोला यादव रुग्णालयात उपस्थित आहेत.

लालू यादव यांना चांगल्या उपचारांसाठी दिल्ली एम्समध्ये पाठवण्यात आले होते, मात्र त्यांना एम्सच्या डॉक्टरांनी दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी त्यांना रांचीच्या रिम्समध्येच उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. अशा परिस्थितीत ते आज दुपारी ३ वाजता दिल्लीहून रांचीला रवाना होणार होते. मात्र विमानतळावरच त्यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना पुन्हा एम्स रुग्णालयात आणण्यात आले.

मंगळवारी एक तासाच्या बैठकीनंतर, लालू यादव यांना चांगल्या उपचारांसाठी रिम्समधून दिल्ली एम्समध्ये पाठवण्याचा निर्णय रिम्सच्या डॉक्टरांनी घेतला होता. अशा परिस्थितीत माजी मुख्यमंत्र्यांची मोठी मुलगी मीसा भारती यांनी दिल्लीहून हेलिकॉप्टर आणले आणि वडिलांना दिल्लीला नेले. मात्र एम्सच्या डॉक्टरांनी लालू यादव यांची तपासणी केली आणि त्यानंतर त्यांना ऍडमिट करून घेण्यास नकार दिला होता.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago