देश

डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, ब्लूटूथ ईयरबडच्या तुकड्यामुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

कोलकात्यामध्ये आर. जे. कर राज्य सरकारी रुग्णालयात एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली असल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात बलात्कार व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला आज सियालदह न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी त्याची कोठडी मागितली होती जी न्यायालयाने मंजूर केली आहे. न्यायमूर्तींनी फिर्यादीची विनंती मान्य करत आरोपीला २३ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.

३१ वर्षीय डॉक्टरचा मृतदेह शुक्रवारी (९ ऑगस्ट) सकाळी रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये मृतावस्थेत आढळला होता. चौकशी अहवालानुसार, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहावर अनेक जखमा दिसत होत्या. तसेच मृतदेहावर अर्धवट कपडे होते. या घटनेमुळे रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून सखोल चौकशीच्या मागणीसाठी अनेक डॉक्टरांनी काम बंद केलं आहे. शनिवारी इतर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरही या आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितलं की अटक केलेला आरोपी संस्थेबाहेरचा आहे. मात्र त्याचं रुग्णालयात नेहमी येणंजाणं होतं. त्यामुळे त्याला रुग्णालयाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये सहज ये-जा करता येत होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी म्हटलं आहे की त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या. तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणातील आरोपीचा शोध घेत असताना त्यांना एका ब्लूटूथ ईयरबडचा छोटासा तुकडा सापडला होता. या छोट्याशा पुराव्याच्या आधारावर पोलीस आरोपीपर्यंत पोहोचू शकले. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर रुग्णालयातील इतर डॉक्टरांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर आरोपीची ओळख पटवली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago