महाराष्ट्र

पुण्यात आज मराठा आरक्षण शांतता रॅली; वाहतुकीत मोठे बदल, ‘या’ भागातील रस्ते राहणार बंद

पुणे : शहरात सारसबागेपासून आज (रविवारी) सकाळी मराठा आरक्षण शांतता रॅली निघणार असल्याने रॅली मार्गावरील वाहतुकीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. रॅली गेल्यानंतर मार्ग पूर्ववत सुरू केले जाणार आहेत.

शांतता रॅली सारसबाग, पुरम चौक, शनिपार, सेवा सदन चौक, अप्पा बळवंत चौक, गाडगीळ पुतळा, शिवाजी पूल, स. गो. बर्वे चौक डावीकळे वळण घेऊन जंगली महाराज रस्त्याने झाशी राणी चौक, गरवारे पूल- छत्रपती संभाजी पुतळा येथे विसर्जन होणार आहे.

वाहतूक बंद होणारे रस्ते
– शनिपार चौक-कुमठेकर रस्ता ते शनिपार चौक
– बेलबाग चौक-लक्ष्मी रस्ता ते बेलबाग चौक
– केळकर रस्ता- टकले हवेली चौकातून अप्पा बळवंत चौकापर्यंत
– बुधवार चौक-अप्पा बळवंत चौकापर्यंत
– जिजामाता चौक- फुटक्या बुरजाकडे
– जयवंतराव टिळक पूल ते शनिवारवाडा
– कुंभारवेस चौक ते गाडगीळ पुतळा
– मंगला टॉकीज ते प्रीमियर गॅरेज
– खुडे चौक-प्रीमिअर गॅरेज
– शिवाजी पुतळा चौक- शिवाजीनगर न्यायालयाकडून येणारी वाहतूक बंद.
– स. गो. बर्वे चौक- संपूर्ण वाहतूक शिमला ऑफिस चौकमार्गे जाईल
– झाशी राणी चौक- सावरकर भवन चौक वाहतूक ओंकारेश्वर पूलमार्गे जाईल.
– महात्मा फुले संग्रहालय- झाशी राणी चौकाकडे वाहतूक बंद.
– भांडारकर रस्त्याकडून वाहने गोपाळ कृष्ण गोखले रस्तामार्गे (फर्ग्युसन कॉलेज रोड) जातील.
– गुडलक चौक- नटराज चौकाकडे वाहतूक बंद
– काकासाहेब गाडगीळ पूल- केळकर रस्त्यावरून वाहतूक बंद.
– भिडे पूल- पुलाची वाडी येथून जंगली महाराज रस्त्याकडे वाहतूक बंद.
– नळस्टॉप चौक- खंडोजीबाबा चौकाकडे वाहतूक बंद.
– रसशाळा चौक- एस एम जोशी पूलाकडील वाहने नळस्टॉप मार्गे जातील
– रॅली खंडोजीबाबा चौकात आल्यानंतर शेलारमामा चौकाकडून खंडोजीबाबा चौकाकडे वाहतूक बंद राहील.
– टिळक चौक- खंडोजीबाबा चौकाकडे वाहतूक बंद राहील. वाहने कुमठेकर व टिळक रस्तामार्गे सोडली जातील

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago