क्राईम

नंदीग्राम एक्सप्रेसच्या शौचालयामध्ये सापडला मृतदेह, काही दिवसांपूर्वी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

मुंबई : नेहमीच गर्दीने गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकात एक धक्कादायक घटना घडली. नंदिग्राम एक्सप्रेस ट्रेनमध्ये एक मृतदेह सापडल्यामुळे दादर रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली. नंदिग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात 50 वर्षांचा व्यक्ती गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला असून पोलिसांनी याप्रकरणी मृत्यूची नोंद केली आहे. रेल्वे पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आला. मृत व्यक्तीने ट्रेनच्या शौचालयात आत्महत्या का केली, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

नंदिग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात 50 वर्षांचा व्यक्ती गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला असून पोलिसांनी याप्रकरणी मृत्यूची नोंद केली आहे. रेल्वे पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आला. मृत व्यक्तीने ट्रेनच्या शौचालयात आत्महत्या का केली, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. मृत व्यक्ती मूळचा घाटकोपर परिसरातील रहिवासी होता. काही दिवसांपूर्वी त्याच्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तो त्या प्रकरणात फरार होता. या प्रकरणामुळे मानसिक तणावात असलेल्या मृत व्यक्तीने आपले जीवन संपवले असल्याचा प्राथमिक संशय आहे.

आरोपीने नांदिग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात स्वतःला गळफास लावण्यासाठी त्याच्याकडील मफलरचा वापर केल्याचं समोर आलं आहे. दादर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago