क्राईम

धक्कादायक! महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवणाऱ्या विकृताला अखेर अटक, 25 महिलांना त्रास देत असल्याचे निष्पन्न

मुंबई: मुंबईतील 25 महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवणाऱ्या विकृताला अटक करण्यात आली आहे. निर्मल नगर पोलीस ठाण्याने ही कारवाई केली असून आयटी अॅक्ट व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद अजीज मोहम्मद निसार खान (36) असे अटक आरोपीचे नाव असून तो वांद्रे येथील बेहरापाडा परिसरात पराठाचे दुकान चालवतो. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

वांद्रे पूर्व येथील 30 वर्षीय गृहिणीला 14 जूनला अनोळखी क्रमांकावरून मोबाईल क्रमांकावरून दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणारा व्यक्ती अश्लील संभाषण करू लागला. महिला दूरध्वनीवर त्याला ओरडली असता आरोपीने तिला अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवण्यास सुरूवात केली. त्यामुळे सदर महिला घाबरली. सुरूवातीला तिने दुर्लक्ष केले. पण आरोपी वारंवार त्रास देत असल्यामुळे तिने हा प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर निर्मल नगर पोलिसांकडे तक्रार केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक(गुन्हे) रौफ शेख यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यास सांगितले.

आरोपी विवाहीत असून त्याचा दोन मुले आहेत. मुंबईतील बेहरामपाडा परिसरात आरोपी भाडेतत्त्वाच्या घरात इतर मित्रासोबत राहतो. आरोपीने गुन्ह्यांसाठी आठ विविध मोबाईलचा वापर केल्याचे तपासत निष्पन्न झाले. आरोपी कमी शिकलेला असला, तरी त्याला मोबाईलमधील तंत्रज्ञानाची बरीच माहिती आहे. त्यामुळे त्याला पकडणे अवघड झाले होते. तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपी खानला शुक्रवारी सापळा रचून बेहरामपाडा परिसरातून पोलिसांनी अटक केली. त्यावेळी आरोपीकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपीच्या मोबाईलच्या तपासणीत तो मुंबईतील 25 महिलांना अशा प्रकारे त्रास देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिलांना आता पोलीस संपर्क साधून आरोपीविरोधात तक्रार करण्यास सांगितले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

5 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago