juhi chawla 5g technology case suit dismissed Rs 20 lakh fine
नवी दिल्ली : जुही चावलाने भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही 5G विरोधातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ही याचिका पब्लिसिटीसाठी असल्याचं सांगत जुही चावलाला कोर्टानं 20 लाखांचा दंड ठोठावला आहे.
जूही चावला हिने 5G वायरलेस तंत्रज्ञानामुळे मानवांवर गंभीर आणि अपरिवर्तनीय परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, त्यामुळे पृथ्वीवरील सर्व परिसंस्थांना कायमची हानी पोहोचण्याचा धोका आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने जूही चावला हिची याचिका फेटाळताना म्हटले की याचिकाकर्त्याने कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर केला आहे आणि यामुळे जुही चावलाला २० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले की हा खटला केवळ प्रसिद्धीसाठी दाखल करण्यात आला होता, असे दिसत आहे आणि म्हणूनच जुही चावला यांनी सुनावणीची लिंक देखील सोशल मीडियावर शेअर केली होती. तसेच या याचिकेतील थोडीशी माहिती योग्य असली तरी बाकीच्या फक्त शंका व्यक्त केल्या आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…