पुणे

चोरट्यांनी बालेवाडीतील कन्स्ट्रक्शन साईटच्या लेबर कॅम्पमध्ये पाच घरे फोडली

पुणे : बालेवाडी येथील किवेस्ट कन्स्ट्रक्शन साईटच्या लेबर कॅम्प येथील पाच खोल्यांमध्ये घरफोडी करून ३६ हजार रुपये चोरल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चतुःश्रुगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहम्मद आलाम (वय २५) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी येथे किवेस्ट कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची राहण्याची सोय तिथेच तयार केलेल्या खोल्यांमध्ये करण्यात आली आहे. एका खोलीत दोन कामगार राहतात. गुरूवारी सकाळी सात वाजता नेहमी प्रमाणे सर्व कामगार कामावर आल्यानंतर अज्ञात व्यक्तीने पाच खोल्यांचे कुलुप तोडून खोल्यांमध्ये प्रवेश केला. चोरट्याने संजय आलम, आफताब आलम, मिनाज, मोहम्मद जाफर, मोहंमद जहीर, आकीम आलम, जावेद आलम, अब्दुल बारी, सुनिल कुमार या सर्वांचे मिळून ३६ हजार रूपये चोरून नेले. सर्व कामगार दुपारी बाराच्या सुमारास कामावरून परतल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

4 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago