देश

देशभरात ७ मे रोजी मॉक ड्रिल, का आवश्यक आहे मॉक ड्रिल? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. परिस्थिती युद्धजन्य होत असल्याने केंद्र सरकारने नागरिकांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना ७ मे २०२५ रोजी ‘सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल’ घेण्याचे आदेश दिले आहेत.

मॉक ड्रिल म्हणजे काय?
मॉक ड्रिल म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी कसे वागावे, कसे सुरक्षित राहावे आणि आपली व इतरांची मदत कशी करावी, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण. युद्ध, दहशतवादी हल्ला, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर संकटाच्या वेळी जी परिस्थिती निर्माण होते, तशीच कृत्रिम परिस्थिती तयार करून सराव केला जातो.

तज्ज्ञांच्या मते, ही एक केवळ सराव प्रक्रिया नसून, नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे आणि संकटाच्या वेळी योग्य निर्णय घ्यायला शिकवणारे प्रशिक्षण आहे.

गृह मंत्रालयाच्या सूचनांनुसार मॉक ड्रिलमध्ये खालील ५ महत्त्वाच्या बाबींचा समावेश असेल:

  1. हवाई हल्ल्याचा सायरन:
    हवाई हल्ला होण्याची शक्यता दर्शवणारा सायरन वाजवून नागरिकांना सतर्क केले जाईल.
  2. नागरिकांना बचाव प्रशिक्षण:
    हल्ला झाल्यास किंवा ब्लॅक आऊट झाल्यास शाळा, कॉलेज, कार्यालय, इमारतींमध्ये लोकांनी कसा बचाव करावा, याचे थेट मार्गदर्शन दिले जाईल.
  3. त्वरित ब्लॅक आऊट:
    हवाई हल्ल्याच्या स्थितीत शत्रूला दिशा आणि ठिकाणं कळू नयेत म्हणून लाईट बंद करण्याचा सराव केला जाईल.
  4. महत्त्वाची ठिकाणं झाकण्याची यंत्रणा:
    सरकारची, लष्कराची आणि इतर महत्त्वाच्या इमारती शत्रूच्या लक्षात येऊ नयेत म्हणून त्यांना झाकण्याची व्यवस्था पाहिली जाईल.
  5. नागरिकांचे स्थलांतर आणि सुरक्षितता:
    संकटाच्या वेळी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा सराव होईल. त्यासाठी वाहनांची, आश्रयस्थानांची आणि स्वयंसेवकांची व्यवस्था तपासली जाईल.

का आवश्यक आहे मॉक ड्रिल?
सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल नागरिकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीस तोंड देण्यास सज्ज करते. त्यामुळे अनपेक्षित प्रसंगात घबराट टाळता येते, लोकांचा जीव वाचू शकतो आणि मालमत्तेचे नुकसान कमी करता येते.
युरोपीय देशांमध्ये अशी मॉक ड्रिल नियमितपणे घेतली जाते. त्यामुळे युद्धजन्य किंवा आपत्तीजनक प्रसंगी नागरिकांना संकट हाताळण्यात अडचण येत नाही.

फिरोजपूर छावणी बोर्डाचा ब्लॅक आऊट सराव
पंजाबमधील फिरोजपूर छावणी बोर्डाने नुकतीच ब्लॅक आऊट रिहर्सल घेतली. रविवारी रात्री ९ ते ९:३० दरम्यान ३० मिनिटे लाईट बंद ठेवून युद्धजन्य स्थितीची रिहर्सल करण्यात आली. यामध्ये नागरिकांनी अंधारात कसे सुरक्षित राहावे, याचे प्रात्यक्षिक दिले गेले. हा सराव यशस्वी झाला असून इतर भागांमध्येही यासारख्या कृती केल्या जातील.

नागरिकांना आवाहन
७ मे रोजी होणाऱ्या मॉक ड्रिलमध्ये सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासन आणि गृह मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. या सरावाचा उद्देश भीती निर्माण करणे नसून, आपत्कालीन प्रसंगी नागरिकांचा जीव वाचवणे हा आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago