देश

अग्निपथ योजनेअंतर्गत IAF कडे तीन दिवसांतच 56,960 अर्ज प्राप्त, भारतीय वायुसेनेची माहिती

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेला (IAF) अग्निपथ भरती योजनेंतर्गत रविवारपर्यंत 56,960 अर्ज प्राप्त झाले आहेत. अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने झाल्यानंतर एका आठवड्यात शुक्रवारी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली, तेव्हापासून तीन दिवसांतच 56,960 अर्ज प्राप्त झाले.

IAF ने रविवारी ट्विटरवर सांगितले कि, “56960! अग्निपथ भरती अर्ज प्रक्रियेला प्रतिसाद म्हणून भविष्यातील अग्निवीरांकडून आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांची ही एकूण संख्या आहे. https://agnipathvayu.cdac.in वर सुरु असलेली नोंदणी 5 जुलै रोजी बंद होईल.”

14 जून रोजी अग्निपथ योजनेचे अनावरण करताना, सरकारने सांगितले होते की 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना चार वर्षांच्या कार्यकाळासाठी सामावून घेतले जाईल, तर त्यातील 25 टक्के लोकांना त्यानंतर नियमित सेवेत समाविष्ट केले जाईल. मात्र, देशातील अनेक भागांत या योजनेच्या विरोधात हिंसक निदर्शने झाली.

सरकारने 16 जून रोजी योजनेंतर्गत भरतीसाठी 2022 सालासाठी 21 वरून 23 वर्षे वयोमर्यादा वाढवली होती आणि त्यानंतर त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर केंद्रीय निमलष्करी दल आणि संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये त्यांना प्राधान्य देण्यासारखी अनेक पावले जाहीर केली होती.

अनेक भाजपशासित राज्यांनीही घोषित केले की ‘अग्निवीर’ सैनिक ओळखले जातील, त्यांना राज्य पोलिस दलात समाविष्ट करताना प्राधान्य दिले जाईल. तथापि, सशस्त्र दलाने हे स्पष्ट केले आहे की ज्यांनी नवीन भरती योजनेच्या विरोधात हिंसक निदर्शने आणि जाळपोळ केली होती त्यांना यात सामील केले जाणार नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

13 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago