Ranbir Kapoor and Alia Bhatt announce pregnancy
मुंबई : आलिया भट्टने तिच्या गरोदरपणाची घोषणा रुग्णालयातून एका सुंदर फोटो शेयर करत केली आहे. या वर्षी एप्रिलमध्ये दोघांनी लग्न केले आणि आता ते लवकरच पालक होणार आहेत. आलिया भट्टने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली की, “आमचे बाळ… लवकरच येत आहे.” फोटोमध्ये आलिया हॉस्पिटलच्या बेडवर आणि रणबीर तिच्या बाजूला दिसत आहे.
रणबीर आणि आलियाने १४ एप्रिलला एका खाजगी समारंभात लग्न केले. त्यानंतर ते त्यांच्या पहिल्या अपत्याची अपेक्षा करत आहेत. अभिनेत्रीने सोमवारी तिच्या गरोदरपणाची आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. त्यांच्या अल्ट्रासाऊंड अपॉईंटमेंटमधील एक फोटो शेअर करताना आलियाने फोटोला कॅप्शन दिले आहे की “आमचे बाळ … लवकरच येत आहे.”
अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्रमध्ये आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. अलीकडेच त्याच्या वैवाहिक जीवनाविषयी बोलताना रणबीर म्हणाला, “चित्रपटांव्यतिरिक्त, माझ्या लग्नामुळे हे वर्ष माझ्यासाठी मोठे ठरले. माझ्या आयुष्यातील ही एक सुंदर गोष्ट आहे.”
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…