देश

माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत वेळ घालवण्यासाठी आईनेच चिमुकलीला संपवले…

हैदराबाद : एका आईनेच आपल्या दोन वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ४ जून रोजी तेलंगणाच्या मेडक जिल्ह्यात घडली. मुलीच्या रात्रीच्या सततच्या रडण्यामुळे तिच्या आईला प्रियकरासोबत वेळ घालवता येत नसल्याने आणि त्यांच्या नात्यात अडथळा येत असल्याने या आईने हा भयानक निर्णय घेतला. आईनेच आपल्या दोन वर्षांच्या मुलीला गळा दाबून ठार केले.

मिळालेल्या माहितीनुसार, शाबाशपल्ली गावाजवळील नाल्याजवळ ममता (२३) आणि तिचा प्रियकर शेख फयाज (३०) यांनी रात्री मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली आणि मृतदेह तिथेच पुरला. मेडक पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून, शुक्रवारी मुलीचे अवशेष बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

२१ मे रोजी ममता सासरच्या घरातून दोन मुलांसह माहेरी आली होती. नंतर ती तिथून देखील निघून गेली. दरम्यान, २७ मे रोजी ममताचे वडील कोटला राजू यांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर तिच्या कुटुंबाने आणि पोलिसांनी तिचा शोध घेतला, पण ममताचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. पोलिस तपासात ममता आपल्या बॉयफ्रेंडसोबत आंध्र प्रदेशातील नरसारावपेट येथे असल्याचे समजले आणि ११ सप्टेंबरला तिला चौकशीसाठी परत आणण्यात आले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत ममताने कबूल केले की, रात्री मुलीच्या सततच्या रडण्यामुळे तिच्या प्रियकरासोबत वेळ घालवण्यात अडथळा येत होता आणि त्यामुळे त्यांनी मुलीला मारण्याचा निर्णय घेतला. दोघांनी रात्री हे भयानक कृत्य केले आणि पहाट होण्यापूर्वी फरार झाले, असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून ममताच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago