मुंबई

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या…

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्त्यात वाढ करण्यासह, भंडारा ते गडचिरोली दरम्यान ९४ किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचे प्रकल्पही समाविष्ट आहेत.

मंत्रिमंडळाचे मुख्य निर्णय:

उद्योग विभाग:

  • महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिऍलिटी धोरण २०२५ जाहीर.
  • २०५० पर्यंतचे नियोजन व सुमारे ३,२६८ कोटी रुपयांचा आराखडा निश्चित.

वस्त्रोद्योग विभाग:

  • अकोला येथील दि. निळकंठ सहकारी सूतगिरणीला “खास बाब” म्हणून शासन अर्थसहाय्य.
  • अर्थसहाय्याचे ५:४५:५० या गुणोत्तरानुसार वाटप.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य:

  • मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे दैनंदिन निर्वाह भत्ता व स्वच्छता प्रसाधन भत्ता सुमारे दुपटीने वाढवण्यात आले.
  • हजारो विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळणार.

सहकार व पणन विभाग:

  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस पुढील दोन वर्षांसाठी मुदतवाढ.
  • राज्यभरातील ११६ बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी व अस्तित्वातील भवनांच्या दुरुस्ती साठी एकूण १३२ कोटी ४८ लाखांचा खर्च.
  • विविध ठिकाणी ७९ नवीन शेतकरी भवन उभारण्याचे प्रस्ताव.

सहकार व पणन विभाग:

  • आधुनिक संत्रा केंद्र उभारण्याच्या योजनेसही दोन वर्षांची मुदतवाढ.
  • नागपूर, काटोल, कळमेश्वर, मोर्शी व संग्रामपूर येथे आधुनिक संत्रा केंद्र उभारले जात आहेत.
  • मुदतवाढीसह योजनेत अनुषंगिक बदल करण्यास मान्यता.

सार्वजनिक बांधकाम विभाग:

  • भंडारा ते गडचिरोली दरम्यान ९४ किलोमीटरचा प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग उभारण्यात येणार.
  • प्रकल्पाच्या आखणीस व भूसंपादनास मान्यता; भूसंपादनासह ९३१ कोटी १५ लाख रुपयांचा खर्च.

ऊर्जा विभाग:

  • नवीनकरणीय ऊर्जा प्रकल्पासाठी महानिर्मिती व मे.सतलज जलविद्युत निगम लि. यांच्या संयुक्त उद्यम कंपनी स्थापन करण्यास मान्यता.
  • राज्यभरात ५,००० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प विकसित होणार.

नियोजन विभाग:

  • राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा.
  • यापुढे राज्यातील पायाभूत प्रकल्पांविषयी उपसमिती मंत्रिमंडळ समिती म्हणून कामकाज करणार.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago