२० वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेश सोडून न्यूझिलंडमध्ये स्थायिक झालेले डॉक्टर गौरव शर्मा हे आता तिथे खासदार झाले आहेत. डॉ. गौरव शर्मा हे हॅमिल्टन वेस्टमधून निवडून आले आहेत. लेबर पार्टीने त्यांना तिकिट दिलं होतं. डॉ. गौरव शर्मा यांना १५ हजार ८७३ मतं मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला ११ हजार ४८७ मतं मिळाली.
गौरव शर्मा हे आपल्या कुटुंबीयांसहित २० वर्षांपूर्वी न्यूझिलंडमध्ये स्थायिक झाले. त्यांचे वडील हिमाचल प्रदेश वीज नियामक मंडळात काम करत होते. डॉ. गौरव शर्मा यांनी याआधीही निवडणूक लढवली होती मात्र त्यांना विजय मिळाला नव्हता. आता मात्र ते विजयी झाले आहेत.
“माझं आरोग्य क्षेत्रातलं काम कोविड १९ च्या आधीच्या काळात आणि कोविड १९ च्या काळात हॅमिल्टनमधल्या लोकांसाठी महत्त्वाचं ठरलं. त्यामुळेच त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला निवडून दिलं”, असं डॉ. गौरव शर्मा यांनी म्हटलं आहे.
डॉ. गौरव शर्मा हॅमिल्टनमध्ये प्रॅक्टीस करतात. मेडिसीन आणि सर्जरी मध्ये त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. तसंच अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून त्यांनी बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचीही पदवी मिळवलेली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…