महाराष्ट्र

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत आता ७.५ हॉर्सपावरचा पर्याय उपलब्ध, ऑनलाईन अर्ज घेणे सुरु

शेतीसाठी शाश्वत वीज पुरवठा व्हावा म्हणुन राज्यात मागील दोन वर्षापासुन मुख्यमंत्री सोलर पंप योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेत आतापर्यंत ३ एचपी व ५ एचपी( हॉर्सपावर) चे पंप देण्यात येत होते. आता यात ७. ५ एचपी सौरपंप संच बसवण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृती सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री सौरपंप योजनेत आरक्षित प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ५% तर खुल्या प्रर्वगातील शेतकऱ्यांसाठी १०% लोकवाटा घेत कृषी सौरसंच बसवण्यात येत आहेत. पहिल्या टप्यात एक लक्ष सौर पंप संच बसवण्याचे महाराष्ट्र शासनाने निश्चित केले होते. शेतकरी वर्गातुन या योजनेस सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मुबलक पाणीसाठा व जास्त जमीन असणाऱ्या बागायती शेतीसाठी जास्त दाबाने पाणी मिळावं म्हणून शेतकऱ्यांची ७ .५ अश्वशक्तीचा पंप मिळावा अशी मागणी होती. ७ .५ अश्वशक्ती कृषीपंपासाठी कमीतकमी ५ एकर पेक्षा जास्त जमीन धारणा असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :

मुख्यमंत्री सौरकृषीपंप योजनेमधून मिळणाऱ्या या पंपसंचा साठी http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर जावे. पारेषण विरहीत विज पुरवठ्यासाठी लाभार्थी अर्ज पर्याय निवडून अर्ज करता येईल.

खालील कागदपत्रे सोबत अपलोड करावीत :

  1. आधार कार्ड
  2. ७ / १२ सातबारा उतारा तलाठी स्वाक्षरीत
  3. आरक्षित प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र
  4. लाईट बिल ( ग्राहक क्रमांक)
  5. बोअरवेल, विहीर अथवा पाणीसाठा स्त्रोताची सातबाऱ्यावर नोंद.

आपल्याला या योजनेसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आपण हा टोल-फ्री क्रमांक वापरू शकता:

  • 18001023435
  • 18002333435
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

6 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

6 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

6 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago