देश

ब्रेकिंग : हरियाणामध्ये भीषण अपघात, गुरुग्राम-द्वारका एक्सप्रेस वेवर उड्डाणपूल कोसळला..

गुरुग्राम : हरियाणाच्या गुरुग्राममध्ये भीषण अपघात झाला आहे. गुरुग्राम-द्वारका द्रुतगती मार्गावरील निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळला आहे. या अपघातात आतापर्यंत दोन कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. मदत व बचावकार्य सुरू आहे.

द्वारका एक्स्प्रेस वेवरील दौलताबाद गावाजवळ ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममध्ये निर्माणाधीन उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला आहे. द्वारका एक्स्प्रेस वेवर उभारण्यात येत असलेल्या एलिव्हेटेड उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला, त्यात दोन लोक जखमी असल्याचे सांगण्यात आले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामुळे मोठा आवाज झाला. तो आवाज ऐकल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीच घटनेची माहिती प्रशासनाला दिली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago