A huge fire broke out in the ICU of the Cardiology Hospital in Kanpur
कानपूरमधील कार्डिओलॉजी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये रविवारी सकाळी भीषण आग लागली. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील आयसीयूमध्ये आग लागल्यानंतर सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या 50 जण रुग्णालयात अडकले असल्याची माहिती मिळत आहे.
कार्डिओलॉजी हॉस्पिटलच्या इमारतीत आग लागल्यामुळे बेडसह रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे. सध्या रूग्ण रस्त्याच्या कडेला उपचार घेत आहेत. कार्डियोलॉजीच्या तळ मजल्यामध्ये धूर भरल्यामुळे, पहिल्या मजल्याच्या स्थितीचा अंदाज लावण्यास अडचण येत आहे. आरोग्य कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान खिडकीच्या काचा फोडून आतमध्ये कोणी अडकले नसल्याची खातरजमा करीत आहेत.
तळ मजल्यावरील सर्व रुग्णांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर 9 रुग्ण अडकल्याची शक्यता आहे. खिडक्यांच्या काचा फोडून व्हेंटिलेशन केले गेले आहे. धूर कमी झाल्यास तळमजला तपासला जाईल. अद्याप तळ मजल्यावर कोणीही अडकल्याची माहिती नाही. प्राथमिक तपासणीत तळ मजल्यावरील स्टोअरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे उघडकीस आले आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…