देश

मोठा दिलासा : जीएसटी रिटर्न भरण्याची प्रक्रिया झाली सुलभ, जीएसटी परतावा भरता येणार SMS द्वारे

जीएसटी रिटर्न भरण्याची प्रक्रिया छोट्या व्यापाऱ्यांसाठी सुलभ करण्यात आली आहे. जीएसटी नेटवर्कने (GSTN) कंपोजीशन टैक्सपेयर्स साठी ज्यांचं रिटर्न निल आहे, त्यांच्यासाठी एसएमएसद्वारे तिमाही परतावा भरण्याची सुविधा सुरू केली आहे. एकूण 17.11 लाख करदात्यांनी कंपोजिशन योजनेंतर्गत नोंदणी केली असून त्यापैकी 20 टक्के म्हणजेच 3.5 लाख करदाते निल रिटर्न्स मध्ये येतात.

याचा अर्थ असा की छोटे व्यापारी किंवा छोटे बिजनेस हाउस ज्यांना जीएसटीची थकबाकी किंवा कर देय नाही, ते आता एसएमएस पाठवून आपला जीएसटी परतावा फाईल करू शकतात. त्यांना जीएसटी पोर्टलला भेट देण्याची गरज भासणार नाही. तथापि, ज्या व्यापाऱ्यांना कर द्यावयाचा आहे त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही.

करदात्यांना फॉर्म जीएसटी सीएमपी -08 मध्ये एसएमएसद्वारे NIL स्टेटमेंट भरता येईल, त्यांना जीएसटीएनच्या पोर्टलवर भेट देऊन प्रवेश करावा लागणार नाही. एसएमएसद्वारे टॅक्स रिटर्न कसे भरायचे, यासाठी जीएसटीएनने मार्ग देखील दर्शविला आहे.

एसएमएसद्वारे जीएसटी रिटर्न कसे भरावे :

  1. निर्धारकाला त्याच्या मोबाइलमध्ये ‘NIL <space>C8<space>GSTIN<space>Return Period’ असा मेसेज टाइप करावा लागेल आणि १४४०९ या क्रमांकावर पाठवावा लागेल.
  2. एसएमएस पाठविल्यानंतर करदात्यास त्याच्या मोबाइलवर 6 अंकी व्हेरीफिकेशन कोड मिळेल.
  3. हा 6 अंकी व्हेरीफिकेशन कोड पुन्हा १4409 या क्रमांकावर पाठवावा लागेल, जेणेकरुन NIL फॉर्म CMP-08 निश्चित होईल.
  4. त्यानंतर जीएसटी पोर्टल करदात्यांना त्यांच्या मोबाईल, ई-मेलवर Application Reference Number (ARN) पाठवेल.
  5. करदाता जीएसटी पोर्टलवर फॉर्म CMP-08 ची स्थिती पाहू शकतात, जिथे ते ‘Filed’ केलेले दिसेल.
  6. जर करदात्याने निर्दिष्ट केलेल्या पद्धतीने एसएमएस पाठविला नसेल तर त्याचा रिटर्न भरला जाणार नाही.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago