A case has been registered against Pankaja Munde, Mahadev Jankar and Ramesh Karad
बीड : पंकजा मुंडे यांनी भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा घेतल्याने त्यांच्यासह ४० ते ५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याचा पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. सावरगाव घाट येथे २५ ऑक्टोंबर रोजी विजयादशमीच्या मुहुर्तावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला होता.
मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा ऑनलाईन घेण्याचं योजण्यात आलं होतं, मात्र तरी देखील पंकजा मुंडेंच्या अनेक सर्मथकांनी यावेळी गर्दी केली. दरम्यान पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर भगवान गडावर पूजा-अर्चना केली आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं होतं.
दसरा मेळावा घेतल्याने पंकजा मुंडेंसह यामध्ये रासप नेते महादेव जानकर, रमेश कराड यांचाही समावेश आहे. अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवानबाबांच्या स्मृतिस्थळ परिसरात पंकजा मुंडे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भगवान बाबा स्मृतिस्थळ परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…