government has already made an appointment for the second dose of the kovishield vaccine
नवी दिल्ली : कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी अगोदरच घेतलेली वेळ म्हणजेच अपॉईंटमेंट वैध असेल आणि को-विन पोर्टलवर ती रद्द केला जाणार नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज स्पष्ट केले. मंत्रालयाने म्हटले आहे की को-विन पोर्टलमध्ये आवश्यक बदल केले गेले आहेत, परिणामी लाभार्थ्याला पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांच्या आत ऑनलाइन अपॉईंटमेंट मिळू शकणार नाही.
13 मे रोजी केंद्राने कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसर्या डोसमधील कालावधी 12-16 आठवड्यांपर्यंत वाढविला आहे. भारत सरकारने या बदलाबाबत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना माहिती दिली आहे. कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्यास 12-16 आठवड्याच्या अंतराने सूचित करण्यासाठी को-विन पोर्टलमध्ये देखील आवश्यक बदल केले गेले आहेत.
सध्या को-विन पोर्टलवर दुसऱ्या डोससाठी 84 दिवसांपेक्षा कमी कालावधीत ज्यांनी अॅपॉईंटमेंट घेतली आहे, त्यांना डोस न मिळताच माघारी यावे लागत आहे. मात्र, ज्यांनी यापूर्वी दुसऱ्या डोससाठी अपॉईंटमेंट घेतली आहे, ती वैध राहणार आहे. परंतु, पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांना दुसर्या डोस 84 दिवसांनंतर घेण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…