देश

कोरोनाचं भयावह रूप.. 24 तास अंत्यसंस्कार सुरु असल्याने वितळली विद्युतदाहिन्यांची धुराडी आणि मेटल फ्रेम

सुरत : कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या धडकी भरवणारी असून सर्वत्र हाहाकार माजला आहे. गुजरातमध्येही भयंकर परिस्थिती ओढवलेली दिसत आहे. सुरतमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढला आहे. यामुळे स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्यांवर प्रचंड ताण पडत असून उष्णतेमुळे विद्युतदाहिन्यांची धुराडी तसेच गॅस फर्नेसच्या मेटल फ्रेम देखील वितळल्या आहेत.

मृतांची संख्या प्रचंड असल्याने सुरतच्या स्मशानभूमींमध्ये 24 तास अंत्यसंस्कार सुरु आहेत. शेजारच्या बरडोली शहरातदेखील अशीच परिस्थिती आहे. यामुळे विद्युतदाहिन्यांची धुराडी आणि गॅस फर्नेसच्या मेटल फ्रेम देखील वितळल्या आहेत. गेल्या आठ-दहा दिवसांपासून स्मशाभूमींमध्ये अहारोत्र मृतदेह जळत आहेत. जवळपास 16 विद्युतदाहिन्यांमध्ये दररोज 100 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याची माहिती येथील प्रशासनाने दिली.

शहरातील प्रमुख स्मशानभूमी मृतदेहांनी ओसंडून वाहू लागली आहेत. रामनाथ घेला, अश्विनी कुमार आणि जहांगीरपुरी या तीन स्मशानभूमी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी 24 तास कार्यरत आहेत. अविरत वापरामुळे तीनही स्मशानभूमीत गॅस फर्नेस वितळल्या आहेत. अविरत वापरामुळे भट्टीच्या फ्रेम्स वितळल्या आहेत. कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार, सूरतमध्ये दररोज १०० हून अधिक मृतदेहांचे अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, स्मशानभूमीत अजूनही ८ ते १० तास प्रतीक्षा करावी लागत आहे. एकूणच परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

7 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago