क्रीडा

IPL 2021 : रोमांचक सामन्यात मुंबईचा कोलकाताविरुद्ध 10 धावांनी विजय

IPL २०२१ : मुंबई इंडियन्सने कोलकातावर 10 धावांनी मात करत मोसमातील पहिला विजय साजरा केला. 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताच्या संघाला आव्हान पूर्ण करता आले नाही. त्यामुळे एकवेळ त्यांच्या हाताशी आलेला विजय हातातून निसटला. त्यांना केवळ 142 धावांपर्यंत मजल मारता आली.

मुंबईकडून क्विंटन डि कॉक आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, डि कॉकला वरुण चक्रवर्तीने अवघ्या दोन धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर सूर्यकुमार यादवने हरभजनच्या एका षटकात तीन चौकार लगावले. मुंबईने पहिल्या पॉवरप्लेमध्ये 1 बाद 42 धावा केल्या. त्याने रोहितसोबत 33 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली. फिरकीपटू शाकिब अल हसनने सूर्यकुमारला बाद करत ही भागीदारी मोडली. सूर्यकुमारने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 56 धावांची खेळी केली. संयमी खेळी करणारा रोहितही 43 धावांवर बाद झाला. कमिन्सने त्याला बोल्ड केले. ईशान किशन, हार्दिक पंड्या मोठे फटके खेळण्याच्या नादात बाद झाले. अष्टपलू खेळाडू आंद्रे रसेलने कायरन पोलार्ड, मार्को जानसेन, कृणाल पंड्या, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर यांना बाद करत मुंबईच्या डावाला खिंडार पाडले. पॅट कमिन्सने 2 बळी घेतले.

मुंबईच्या 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचे सलामीवीर शुबमन गिल आणि नितीश राणा यांनी 72 धावांची सलामी भागीदारी रचली. त्यानंतर राहुल चहरने गिलला (३३ धावा) माघारी धाडत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर चहरने ईऑन मॉर्गन (7), राहुल त्रिपाठी (5) यांनाही बाद केले. नितीश राणाने सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, चहरने त्यालाही बाद केले. राणाने 6 चौकार आणि 2 षटकारांसह 57 धावा केल्या. राणा बाद झाल्यानंतर अपेक्षित धावा आणि चेंडू यांचे अंतर वाढतच गेले. शेवटच्या दोन षटकात बुमराह आणि बोल्टने अप्रतिम गोलंदाजी केली. शेवटच्या षटकात 15 धावांची गरज असताना बोल्टने रसेल आणि कमिन्स यांना बाद केले आणि मुंबईने यंदाच्या हंगामात पहिला विजय मिळवला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago