Earth Hour will be celebrated tonight at 8.30 pm
नवी दिल्ली : दर वर्षी मार्चच्या शेवटच्या शनिवारी रात्री साडेआठ वाजता जगभरातील कोट्यावधी लोक एका तासासाठी लाईट बंद करतात आणि पृथ्वीच्या उन्नतीसाठी एकत्रित होतात. हा दिवस जगभर अर्थ-आवर (Earth Hour) म्हणून ओळखला जातो. यावर्षी, अर्थ आवर दिन 27 मार्च रोजी आला आहे. यानिमित्ताने जगातील 180 हून अधिक देशांतील लोक रात्री ८.30 ते ९.30 या वेळेत त्यांच्या घरातील दिवे बंद ठेवतील आणि उर्जेची बचत करून पृथ्वी वाचवण्यासाठी एकतेचा संदेश देतील.
वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर (WWF) या वन्यजीव आणि पर्यावरण संघटनेने 2007 मध्ये अर्थ आवर डेची सुरुवात केली होती. 31 मार्च 2007 रोजी प्रथमच अर्थ आवर दिन साजरा करण्यात आला. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे याचे प्रथम आयोजन करण्यात आले होते. यात लोकांना 60 मिनिटांसाठी सर्व दिवे बंद ठेवण्याची विनंती केली गेली होती. हळूहळू हे संपूर्ण जगभरात साजरे होऊ लागले.
अर्थ-आवरचा उद्देश :
अर्थ आवर दिनानिमित्त लोकांना रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत आपली घरी आणि कामाच्या ठिकाणी दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले जाते. २००9 मध्ये भारत या मोहिमेचा एक भाग झाला. २००९ मध्ये भारताने पहिला अर्थ-आवर दिन साजरा केला. यात 58 शहरांमधील 5 दशलक्ष लोकांनी सहभाग घेतला होता. २०१० मध्ये भारताच्या १२8 शहरांमधील 7 दशलक्षाहून अधिक लोकांनी या उपक्रमात भाग घेतला. त्यानंतर ही संख्या वाढत गेली.
या ऐतिहासिक इमारतींवरील दिवे देखील केले जातात बंद :
पॅरिसस्थित आयफेल टॉवर, न्यूयॉर्कची एम्पायर स्टेट बिल्डिंग, दुबईची बुर्ज खलिफा, अथेन्समधील अॅक्रोपोलिस ही दरवर्षी अर्थ आवर मध्ये सहभाग घेणार्या 24 जागतिक स्थळांपैकी आहे. भारतात अर्थ आवर दरम्यान राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि इंडिया गेटसह अनेक ऐतिहासिक इमारतींमधील दिवे बंद करण्यात येतात.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…