पुणे

पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटमध्ये भीषण आग

पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटमध्ये रात्री 11 च्या सुमारास भीषण आग लागली होती. या परिसरात मोठ्या संख्येने कपड्यांची दुकाने आहेत, त्यामुळे आग काही क्षणांत पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

फॅशन स्ट्रीट हे चहुबाजूनी गजबजलेले असून तिथे जाण्यासाठी छोटासा रस्ता आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना तिथपर्यंत पोहोचणे अडचणीचे होत होते. तसेच इथे बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती, त्यामुळे आग विझवण्याच्या कामात अग्निशमन दलाच्या जवानांना अडचणी येत होत्या. आग नक्की कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या आगीत कपड्यांची दुकानं असलेल्या व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अखेर तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

19 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago