देश

देवघर रोपवे दुर्घटना : बचाव कार्यादरम्यान पुन्हा मोठी दुर्घटना, 1500 फूट उंचीवरून पडून महिलेचा मृत्यू

झारखंड : देवघर रोपवे दुर्घटनेच्या बचाव कार्यादरम्यान पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. यावेळी एक महिला अपघाताची बळी ठरली आहे. तिला देवघर सदर रुग्णालयात पाठवले, मात्र डॉक्टर तिला वाचवू शकले नाही. ट्रॉलीच्या केबिनमधून बाहेर काढल्यानंतर तिला उचलत असताना महिला खाली पडली आणि जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून त्यात तीन महिला आणि एका तरुणाचा समावेश आहे. शोभा देवी असे मृत महिलेचे नाव असून त्या देवघर येथील झांसागढी येथील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, त्रिकूट पर्वत रोपवे ट्रॉली क्रमांक ७ मधून हेलिकॉप्टरच्या मदतीने लोकांना बाहेर काढण्यात येत होते. यादरम्यान एका महिलेला हेलिकॉप्टरमधून सोडलेल्या दोरीच्या सहाय्याने केबिनमधून बाहेर काढण्यात आले. गरुड कमांडोचे जवान तिला बाहेर काढत होते. हेलिकॉप्टरमध्ये वरच्या दिशेने नेण्याऐवजी काही कारणास्तव महिलेला खाली उतरवले जात होते. यादरम्यान दोरीला जोरदार धक्का बसला. महिला ज्या दोरीने लटकत होती ती दोरी केबिनमध्ये कुठेतरी अडकली आणि बाहेर पडल्यानंतर जोरदार धक्का बसला आणि ती खाली जाऊ लागली, मात्र दोरीला दुसरा धक्का बसला आणि महिला खाली आली.

सोमवारची दुर्घटना पाहता हवाई दलाच्या जवानांनी रेस्क्यू हेलिकॉप्टरच्या खाली जाळी टाकली होती, जेणेकरून कोणी खाली पडल्यास त्याचा जीव वाचू शकेल. बचावादरम्यान महिला हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचण्यापूर्वी घसरली आणि खाली पडली. ती जाळीवर पडली आणि तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टर तिला वाचवू शकले नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला डोंगरावरून खाली पडली आणि दोरी तुटल्यामुळे जखमी झाली. सोमवारी बचाव कार्यादरम्यान दुमका येथील एक पुरुष हेलिकॉप्टरमधून सुमारे 2000 फूट उंचीवरून खाली पडला. त्याचा लगेच मृत्यू झाला होता. यापूर्वी रविवारी दोन महिलांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आता हे रेस्क्यू ऑपरेशन संपलं असून इतर सर्वांना जवानांनी सुखरूप बाहेर काढलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago