The young man killed his own mother and burned her body in the yard
पुणे : प्रेमसंबंधातून झालेल्या वादात प्रियकराने प्रेयसीचा भिंतीवर डोके आपटून खून केला, त्यानंतर चोरीचा बनाव करून प्रेयसीच्या अंगावरील दागिने, मोबाईल चोरून पळ काढला. सुनीता बाळू कदम (वय ४४, रा. वैदूवाडी, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सुनीता यांच्या विवाहित मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी किसन सीताराम जगताप (वय ४६, रा. नारळीचा मळा, ता. पुरंदर, जि. पुणे) याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किसन व सुनीता या दोघांत गेल्या १० ते १२ वर्षांपासून संबंध होते. सुनीता त्याला लग्नासाठी तगादा लावत होत्या आणि किसनला त्याच्या मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती. त्यातूनच त्याने प्लॅन करून हा खून केला. आरोपीने शनिवारी ९ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता एक कोल्डड्रिंकची बाटली घेतली. त्यात झोपेच्या गोळ्या टाकून ते सुनीताला पाजले. तिच्यासोबत गप्पा मारण्याचे नाटक केले. त्यानंतर तिला गुंगी येताच जोरात तिचे डोके भिंतीवर आदळले. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तो सुनीता यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल, एटीएम कार्ड हा ऐवज चोरून पळून गेला.
हा प्रकार रविवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास सुनीता यांच्या मुलीच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ हडपसर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरु केला, तेव्हा गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाच्या जाळ्यात आरोपी अडकला. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, कर्मचारी रमेश सावळे, आश्रुबा मोराळे, प्रमोद टिळेकर यांनी किसनला राहत्या घरातून ताब्यात घेतले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे अधिक तपास करीत आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…