देश

ब्रेकिंग! बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा, कार्यक्रमादरम्यान झाला बॉम्बस्फोट

बिहार : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेत महिनाभरात दुसऱ्यांदा हलगर्जीपणाचे प्रकरण समोर आले आहे. मंगळवारी जनसंवाद कार्यक्रमादरम्यान नालंदामध्ये बॉम्बस्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिलाव येथील गांधी हायस्कूलमध्ये नितीश कुमार यांच्यापासून अवघ्या 15-18 फूट अंतरावर हा बॉम्बस्फोट करण्यात आला.

या घटनेत कोणतीही दुखापत झाल्याची माहिती नसून हा बॉम्ब फटाक्याचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नितीश कुमार यांच्या संरक्षणात तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. याआधी एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुष्पहार अर्पण करताना एका व्यक्तीने कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला होता, त्याला तत्काळ अटक करण्यात आली होती. स्फोटानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. मोठा आवाज झाल्यानंतर चेंगराचेंगरी झाली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 महिने ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 महिने ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago