देश

श्रद्धा हत्या प्रकरण : दिल्ली न्यायालयाकडून आफताबच्या नार्को टेस्टला मंजूरी

नवी दिल्ली : आफताब पूनावाला, ज्याने आपली मैत्रिण श्रद्धा वालकर हिची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केले, त्याची नार्को-विश्लेषण चाचणी केली जाणार आहे, कारण तो पोलिसांना चुकीची माहिती देत होता आणि तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. दक्षिण दिल्लीतील साकेत येथील न्यायालयाने आफताब पूनावालाची नार्को चाचणी करण्यास परवानगी दिली आहे.

आफताब याने त्याची मैत्रिण श्रद्धा वालकर हिचा फोन आणि मृतदेह कापण्यासाठी वापरलेल्या हत्यारांचे नेमके काय केले याची चुकीची माहिती देऊन त्याने तपास यंत्रणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांना संशय आहे. चौकशीदरम्यान, आफताब पूनावाला आपली उत्तरे बदलत होता, त्याने अगोदर सांगितले की श्रध्दा वालकरचा मोबाईल महाराष्ट्रात फेकून दिला आणि दुसर्‍या वेळी त्याने दिल्लीत फोन टाकून दिल्याचे सांगितले.

दिल्ली पोलीस आता आफताबची नार्को टेस्ट करणार आहेत. यासाठी पोलिसांनी दक्षिण दिल्लीतील साकेत कोर्टाची परवानगी घेतली आहे. आफताब तपास वळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत नार्को टेस्टमुळे अनेक गुपिते उघड होण्यास मदत होऊ शकते.

नार्को चाचणी काय आहे?
या चाचणीमध्ये एक औषध इंजेक्शनमधून दिले जाते, ज्यामुळे व्यक्ती ऍनेस्थेसियाच्या विविध टप्प्यात प्रवेश करते, ज्यामुळे संमोहन अवस्था येते आणि व्यक्ती कमी प्रतिबंधित होते, अशावेळी व्यक्तीची अशी माहिती प्रकट करण्याची शक्यता अधिक असते, जी सहसा जाणीव अवस्थेत प्रकट होत नाही. नार्को चाचणीदरम्यान पोलिसांच्या पथकासोबत मानसोपचारतज्ज्ञही असतील.

श्रद्धा आणि आफताब डेटिंग ऍपमुळे आले संपर्कात
बंबल या डेटिंग ऍपच्या माध्यमातून श्रद्धा आणि आफताब एकमेकांच्या संपर्कात आले. नंतर ते एका कॉल सेंटरमध्ये एकत्र काम करू लागले. श्रद्धाच्या कुटुंबीयांनी या नात्यावर आक्षेप घेतल्यानंतर ते दिल्लीला गेले आणि मेहरौलीमध्ये राहू लागले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago