महाराष्ट्र

विनायक मेटे अपघातप्रकरणी मोठी माहिती, सीआयडीकडून मेटेंच्या चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या चालकाविरोधात मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सीआयडीकडून तपास करण्यात येत असून सीआयडीकडून रसायनी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला गेला आहे.

विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. ज्या मार्गावरून विनायक मेटे यांची कार अपघातास्थळापर्यंत पोहोचली त्या मार्गांवरील प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे व्हिडिओ फुटेज सीआयडीने तपासले होते. याशिवाय या अपघातामध्ये कोणाची चूक दिसते आहे? हे समजून घेण्यासाठी आयआरबीचे इंजिनीअर, आणि इतर रोड इंजिनीअर्सची एक तांत्रिक समिती बनवून त्यांच्याकडून एक मत घेण्यात आलं होतं. तपासानंतर सीआयडीने कलम ३०४ (२) नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

विनायक मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट २०२२ रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु तिथे विनायक मेटे यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली होती. यानंतर या अपघात आणि मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना दिले होते.

सीआयडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात १४० ते १२० च्या वेगाने मेटेंचा चालक हा कार चालवत असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय अपघात झालेल्या घटनेच्या ठिकाणीही तपास करण्यात आला. कारला अपघात होण्यापूर्वी चालक एकनाथ कदम राइट घेऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. पण त्या बाजूला जागा नव्हती कारण आधीच एक गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती. यामुळे ओव्हरटेक करता येणार नाही हे चालक एकनाथ कदमच्या लक्षात आलं होतं, पण तरीही त्याने कार तिथे घातली. आणि त्यामुळे डाव्याबाजूला धक्का बसला आणि हा भीषण अपघात झाला. सीआयडीच्या तपासात हे समोर आलं आणि त्यानंतर रसायनी पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मेटेंचा चालक एकनाथ कदम याला पोलीस लवकरच ताब्यात घेतील.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago