Government of Maharashtra
मुंबई : पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेण्यासाठी औरंगाबाद येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था प्रवेशपूर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते. 11 वी, 12 वीच्या नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा, सशस्त्र सीमा बलासाठी मुलाखती याबरोबरच मैदानी खेळाचे प्रशिक्षणही देते. हे प्रशिक्षण देण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या तज्ज्ञ मानसेवी प्राध्यापकांचे मानधन आता एक हजार रूपये करण्यात आले आहे.
यापूर्वी प्राध्यापकांना देण्यात येणारे प्रति तास रूपये 300 इतके मानधन तुटपुंजे ठरत असल्याने यात वाढ करून हे मानधन आता एक हजार रूपये इतके करण्यात आले आहे.
तासिका तत्वावरील हे निमंत्रित प्राध्यापक संबंधित अभ्यासक्रमाशी निगडीत किंवा सेवानिवृत्त तज्ज्ञ व्यक्ती असले पाहिजे. याबाबतची खात्री सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद यांच्याकडून करण्यात येईल. या निमंत्रित प्राध्यापकांना मानधनाव्यतिरिक्त दैनिक भत्ता, वाहन भत्ता अनुज्ञेय असणार नाही.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…