देश

देशात वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून अनेक जणांचा मृत्यू, विजेपासून वाचण्यासाठी करा ‘हे’ उपाय

नवी दिल्ली : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वीज पडणे अतिशय सामान्य आहे. परंतु, ही वीज पडल्याने बर्‍याचदा लोकांना आपला जीव देखील गमवावा लागतो. रविवारी राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह इतर काही राज्यात वीज पडल्याने अनेक लोकांचा बळी गेला.

जयपूरमध्ये वीज कोसळल्याने 16 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 11 जणांचा जयपूरच्या आमेर किल्ल्यावर बांधलेल्या वॉच टॉवरवर मृत्यू झाला. हे लोक येथे सेल्फी घेत असतांना वीज कोसळली, त्यावेळी सुमारे 35 लोक तिथे उपस्थित होते. वीज कोसळल्याने बरेच लोक खाली पडले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, विज चमकणे आणि वीज कोसळणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपणास आश्चर्य वाटेल, पण पृथ्वीवर वीज पडण्याच्या घटना जवळजवळ दर मिनिटाला घडतात. जेव्हा विज कोसळते, तेव्हा आकाशातील तापमान सुमारे 15,000 डिग्री फॅरेनहाइटपर्यंत असू शकते. वीज केव्हा व कोठे कोसळेल, हे सांगता येत नाही.

प्रतिबंधात्मक उपाय :

  1. आपण घरात असाल आणि वादळ किंवा पाऊस सुरु असेल तर, आपल्या टीव्ही, रेडिओ, फ्रिज किंवा इतर विद्युत उपकरणे बंद करा आणि अशा वस्तूंचे प्लग काढून ठेवा.
  2. पावसात मोबाइल वापरणे टाळा.
  3. अनवाणी पायाने जमिनीवर उभे राहू नका.
  4. विद्युत उपकरणांपासून दूर रहा. तसेच, अशा गोष्टींपासून दूर रहा जे विजेचे वाहक होऊ शकतात. जसे लोखंडी पाईप्स इ.
  5. झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात जाणे टाळा आणि इमारतीच्या खाली लपून स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न करा.
  6. आपल्याकडे रबरचे बूट असल्यास, घरातून बाहेर पडताना शक्यतो त्यांचा वापर करा.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago