अर्थकारण

इनकम टॅक्सच्या नवीन पोर्टलच्या तांत्रिक उणीवांचा फटका, ‘या’ कामांमध्ये येताय अडचणी

नवी दिल्ली : इनकम टॅक्सचे नवीन पोर्टल www.incometax.gov.in मुळे अजूनही अनेक जणांना त्रास सहन करावा लागत आहे. नवीन पोर्टल लॉन्च होऊन आता एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे, परंतु, अजूनही त्याच्या तांत्रिक उणीवा दूर करण्यात आलेल्या नाहीत. अर्थमंत्र्यांनीही दोन आठवड्यांपूर्वी या पोर्टलच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. चार्टर्ड अकाउंटंट्स (CA) म्हणतात की या पोर्टलवर ई-प्रोसेसिंग आणि डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र यासारख्या बर्‍याच गोष्टी अद्याप सुरू झाल्या नाहीत. या व्यतिरिक्त काही विदेशी कंपन्यांनाही पोर्टलवर लॉग इन करण्यात समस्या येत आहेत.

www.incometax.gov.in हे नवीन पोर्टल 7 जून रोजी लॉन्च केले गेले. इन्फोसिसने ही नवीन वेबसाइट तयार केली आहे. इन्फोसिसला इन्कम टॅक्स फाइलिंग सिस्टम विकसित करण्याचा प्रोजेक्ट 2019 मध्ये देण्यात आला होता. पोर्टल लॉन्च झाल्यापासूनच तांत्रिक अडचणींचा सामना करत आहे. यासंबंधात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची 22 जून रोजी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. परंतु, अजूनही वापरकर्त्यास अद्याप अनेक अडचणी येत आहेत. मागील वर्षातील आयकर विवरणपत्र दाखल करता येत नाहीत. मूल्यांकन वर्ष २०१९-20 आणि आधीच्या वर्षांच्या इंटिमेशन नोटिस डाउनलोड करता येत नाहीत. तसेच, पोर्टलवर विवाद से विश्वास योजनेअंतर्गत फॉर्म -3 दिसत नाही.

बीडीओ इंडियाचे भागीदार (कर आणि नियामक सेवा) अमित गणात्रा यांनी सांगितले कि, “22 जून रोजी अर्थमंत्र्यांसमवेत झालेल्या इन्फोसिस टीमच्या बैठकीनंतर असे दिसते की लवकरच सर्व प्रश्न सोडविण्यात येतील. त्यानंतर साइटच्या कामकाजात काही सुधारणा झाली असली, तरी तंत्रज्ञानाशी संबंधित आव्हाने अजूनही शिल्लक आहेत. साइट पूर्णपणे कार्यरत होण्यासाठी थोडा वेळ लागेल. ई-प्रक्रिया संबंधित टॅब पूर्णपणे काम करत नाहीयेत. ऑनलाइन दुरुस्ती पर्याय उपलब्ध नाही. 5, 6, 7 मध्ये प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी जेएसओएन सुविधा उपलब्ध नाही. मागील वेबसाइटप्रमाणेच या पोर्टलवर विवाद से विश्वास योजनेची सर्वसमावेशक माहिती देण्यासाठी कोणताही टॅब नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago