देश

धर्मगुरू दलाई लामा यांना देण्यात आला कोरोना लसीचा पहिला डोस

हिमाचल प्रदेश सरकारच्या मान्यतेनंतर आज (शनिवार) सकाळी धर्मगुरू दलाई लामा यांना कोरोना लस देण्यात आली. जिल्हा कांगडा आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात वयोवृद्ध लोकांसाठी सुरु असलेल्या कोरोना लस मोहिमेअंतर्गत धर्म गुरू दलाई लामा यांना लस देण्यात आली.

तिब्बती प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी कोरोना लस मिळावी यासाठी विनंती केली होती. यानंतर आरोग्य विभागाने सरकारकडे प्रस्ताव पाठविला. विभागाच्या प्रस्तावावर शासकीय मान्यतेनंतर दलाई लामाला आज सकाळी प्रादेशिक रुग्णालय धर्मशाला येथे कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला.

लसीकरणानंतर दलाई लामा यांनी सर्व लोकांना लस घेण्याचा संदेश दिला. दलाई लामा म्हणाले कि, “कोरोनाशी लढण्यासाठी कोरोनाची लस अत्यंत प्रभावी आहे. सर्व लोकांनी ही लस घेण्यासाठी पुढे यावे.” दलाई लामा यांच्या लसीकरणानंतर आता त्यांचे 70 हून अधिक कर्मचारी आणि अनुयायी यांचेदेखील लसीकरण केले जाणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago