Corona uncontrolled
देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची नवीन आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र, पंजाब, मध्य प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्रात कोरोना पुन्हा अनियंत्रित होत आहे. एकाच दिवसात संसर्गाचे प्रमाण 250% वाढले आहे. शनिवारी राज्यात 10,216 लोक संक्रमित झाले. 5 महिन्यांनंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एका दिवसात 10,000 पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी 17 ऑक्टोबर रोजी 10,259 कोरोनाचे रुग्ण आढळले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूची 18,327 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. तर कोरोनामुळे मागील 24 तासात 108 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा नवीन स्ट्रेन :
आतापर्यंत कोरोनाचा नवीन स्ट्रेन असलेले 240 रूग्ण आढळले आहेत. हा नवीन स्ट्रेन अत्यंत धोकादायक आणि वेगाने पसरणारा आहे. यूके, ब्राझील आणि अमेरिका या स्ट्रेनचा सामना करीत आहेत. आता परदेशात जाण्याचा कोणताही इतिहास नसलेल्या लोकांनाही या नवीन स्ट्रेनची लागण होऊ लागली आहे, त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…