देश

COWIN पोर्टलवरून लसीची नोंद करणाऱ्यांसाठी आता ‘हा’ कोड आवश्यक, जाणून घ्या..

नवी दिल्ली : भारतात सध्या कोरोना लसीकरण सुरू आहे. या लसीसाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. कोविन पोर्टल (CoWin Portal)वर एक खास नवीन फीचर जोडले गेले आहे. आता युजर्संना सिक्योरिटी कोड पाठवले जात आहे. आता या कोडविना कोविन पोर्टलवरून लस बुक करणाऱ्यांना लस दिली जाणार नाही. लस घेतेवेळी हा कोड दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले की, काही लोकांच्या तक्रारी होत्या की, लससाठी अपॉइंटमेंट घेतली होती. परंतु, त्यावेळेत लस घेण्यासाठी जात आले नाही. तरीही एसएमएस द्वारे त्यांना सांगण्यात आले की, त्यांचा लसीचा एक डोस पूर्ण झाला आहे. अशा तक्रारी येऊ लागल्यामुळे कोविन पोर्टलला एक नवीन फीचर जोडण्यात आले आहे. आता वॅक्सिनेशन केंद्रावर लस घेण्यासाठी जाताना हा चार अंकी कोड विचारला जाईल. त्यानंतर तो कोड त्या ठिकाणी सबमिट केला जाईल. त्यानंतर लस देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.

CoWin Portal वर कोविड वॅक्सीनसाठी अशी घ्या अपॉइंटमेंट :

  1. सर्वात आधी ब्राउजर मध्ये जाऊन cowin.gov.in वेबसाइट ओपन करा.
  2. आता स्क्रीनवर वरच्या बाजुला Register/Sign In yourself लिहिलेले दिसेल. या ठिकाणी क्लिक करा.
  3. आता Register or SignIn for Vaccination च्या खाली आपला मोबाइल नंबर टाइप करा.
  4. आता एक ओटीपी येईल. तो एन्टर करा.
  5. ओळखपत्रांची माहिती त्यात भरा. लस घेताना ते ओळखपत्र सोबत घेऊन जा.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago