ग्लोबल

काबूलमधील एका शाळेजवळ बॉम्बस्फोट, 25 ठार, ५२ जखमी

अफगाणिस्तान : पश्चिम काबूलमधील एका शाळेजवळ आज बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यात 25 जण ठार झाले, त्यापैकी अनेकजण तरुण विद्यार्थी आहेत. तर ५२ जण जखमी झाल्याची माहिती अफगाण सरकारच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

सय्यद अल-शाहदा शाळेजवळ झालेल्या या स्फोटात जखमी झालेल्यांना बाहेर काढण्यासाठी येथे रुग्णवाहिकांची गर्दी झाल्याचे गृह मंत्रालयाचे प्रवक्ता तारिक आर्यन यांनी सांगितले. यावेळी संतप्त जमावाने रुग्णवाहिकांवर हल्ला केला आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाणही केली, असे आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते गुलाम दस्तीगार नाझारी यांनी सांगितले. रहिवाशांना त्यांनी विनंती केली की सहकार्य करा आणि रुग्णवाहिकांना घटनास्थळावर प्रवेश द्या.

मुहम्मद अली जिन्ना रुग्णालयात हॉलवे आणि खोल्यांमध्ये जखमींची गर्दी असून तिथे अनेक जणांचे मृतदेह ठेवलेले आहेत. रुग्णालयाच्या बाहेर कितीतरी लोक रक्तदान करण्यासाठी रांगेत उभे आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago