देश

काँग्रेस नगरसेवकाला महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक

बेंगळुरू : कन्नूरचे नगरसेवक पीव्ही कृष्ण कुमार यांना लैंगिक शोषण प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ते एडक्कड मतदारसंघाचे अध्यक्ष होते. फरार असलेल्या कृष्ण कुमारला सहायक आयुक्त पीटी के रत्नकुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेंगळुरू येथून अटक केली.

कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या एका महिला कर्मचाऱ्याने 20 जुलै रोजी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. कन्नूर कॉर्पोरेशन किझुन्ना विभागाचे काँग्रेस नगरसेवक कृष्ण कुमार यांनी कामाच्या ठिकाणी तिचे लैंगिक शोषण केले. बँक सेक्रेटरी आणि इतर कर्मचारी बाहेर गेल्यावर त्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तिने केला. याप्रकरणी शहर पोलीस आयुक्त आणि महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती.

एडक्कड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर कृष्ण कुमार फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद होता. पोलिसांनी तपास करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कृष्ण कुमारला सहायक आयुक्त पीटी के रत्नकुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेंगळुरू येथून अटक केली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago