देश

OMG! नवरदेवाने फोटोग्राफर आणला नाही, संतापलेल्या वधूने थेट लग्नच मोडले…

उत्तर प्रदेश : आजकाल छोट्या-छोट्या गोष्टींवरून अनेकांची लग्ने मोडल्याचा घटना समोर येतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील मंगलपूरमधून समोर आली आहे. नवरदेवाकडच्या लोकांनी फोटोग्राफर आणला नाही, म्हणून नवरीला राग आला आणि तिने लग्न करण्यास नकार दिला. अखेर फोटोग्राफरला न आणल्यामुळे लग्न मोडले.

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूर जिल्ह्यातील मंगलपूर गावात शनिवारी रात्री वरपक्षाची मंडळी नाचत-गात लग्नासाठी पोहोचली. यानंतर काही विधी पार पडले. रात्री उशिरा जयमाला विधी सुरू झाला आणि नववधू तिथे पोहोचली. मात्र, वधूने बघितले की नवरदेवाच्या बाजूने फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी कोणीही फोटोग्राफर आणला नव्हता. त्यामुळे या नवरीला खूप राग आला. ती स्टेजवरून उठली आणि निघून गेली. घरच्यांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण वराच्या बाजूने फोटोग्राफर का आला नाही याचा तिला खूप राग आला. ती म्हणाली कि, लग्नातील मौल्यवान आणि मनमोहक क्षण टिपण्यासाठी ज्या व्यक्तीने फोटोग्राफर आणला नाही, तो भविष्यात माझी काळजी कशी घेणार?

सुरुवातीला घरच्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण नंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. पंचायत सुरू झाली. मात्र, वधूने लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांना सर्व सामान परत केले आणि वरपक्षाकडील मंडळी परत निघाली. फोटोग्राफरला न आणण्यावरून हा सगळा वाद सुरू झाला आणि अखेर लग्न मोडले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago